तुमची हिंमत तरी कशी होते? Things to know about teenage climate activist: Greta Thunberg.
तुमची हिंमत तरी कशी होते ? Things to know about teenage climate activist: Greta Thunberg स्वीडनची अवघ्या सोळा वर्षांच्या ग्रेटा थनबर्गनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. पर्यावरणरक्षणासाठी तरुण पिढीचा आवाज बनलेली स्वीडनमधील किशोरवयीन पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला 'पर्यायी नोबेल पुरस्कार' म्हणून ओळखला जाणारा 'राइट लाइव्हलीहूड अॅवॉर्ड' घोषित झाला आहे. तुमची हिंमत तरी कशी होते ? स्वीडनची अवघ्या सोळा वर्षांच्या ग्रेटा थनबर्गनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. या किशोरवयीन पर्यावरण कार्यकर्तीनं गेल्या सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत केलेल्या छोट्याशा भाषणाची सर्वत्र चर्चा होत आहे. वाढत्या ऊर्जावापरामुळं वाढत असलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वी तापतेय. या जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम हवामान बदलाच्या रूपानं दिसू लागले आहेत. ते रोखण्यासाठी उत्सर्जन कमी करण्याची गरज आहे. मात्र , त्यावर विविध देशांच्या नेत्यांचं एकमत होत नसल्यानं दुष्परिणामांचा धोका वाढला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ग्रेटानं अत्यंत उद्विग्न होऊन , पण...