तुमची हिंमत तरी कशी होते? Things to know about teenage climate activist: Greta Thunberg.
तुमची हिंमत तरी कशी होते?
Things to
know about teenage climate activist: Greta Thunberg
स्वीडनची अवघ्या सोळा वर्षांच्या
ग्रेटा थनबर्गनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय.
पर्यावरणरक्षणासाठी तरुण पिढीचा आवाज बनलेली स्वीडनमधील किशोरवयीन पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला 'पर्यायी नोबेल पुरस्कार' म्हणून ओळखला जाणारा 'राइट लाइव्हलीहूड अॅवॉर्ड' घोषित झाला आहे.
तुमची हिंमत तरी कशी होते?
स्वीडनची अवघ्या
सोळा वर्षांच्या ग्रेटा थनबर्गनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. या किशोरवयीन
पर्यावरण कार्यकर्तीनं गेल्या सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत
केलेल्या छोट्याशा भाषणाची सर्वत्र चर्चा होत आहे. वाढत्या ऊर्जावापरामुळं वाढत
असलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वी तापतेय. या जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम
हवामान बदलाच्या रूपानं दिसू लागले आहेत. ते रोखण्यासाठी उत्सर्जन कमी करण्याची
गरज आहे. मात्र, त्यावर विविध देशांच्या नेत्यांचं एकमत होत नसल्यानं दुष्परिणामांचा धोका
वाढला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ग्रेटानं अत्यंत उद्विग्न होऊन, पण संयतपणे संयुक्त
राष्ट्रांच्या व्यासपीठावरून जगाच्या कारभाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. तिने
केलेल्या भाषणाचा हा भावानुवाद.
माझा संदेश साधा
आहे. तो म्हणजे, 'आम्ही तुमच्याकडे पाहत आहोत, तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत.' जे घडतंय ते चुकीचं
आहे. मी खरं तर इथं असायला नको आहे. सागराच्या त्यापल्याड असलेल्या शाळेत मी
असायला हवी होते; पण तरी तुम्ही आम्हा तरुण पिढीकडे आशेनं पाहताय. तुमची हिंमत तरी कशी होते?
तुमच्या पोकळ शब्दांनी तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलंय; माझ्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. आणि तरीही मी काही भाग्यवंतांपैकी एक आहे. लोक दु:खात आहेत, त्यांना वेदना होताहेत. ते मरताहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, संपूर्ण भवताल डळमळू लागलंय. जनसमुदाय नामशेष होण्याच्या टोकावर आपण येऊन पोहोचलोय. त्याची सुरुवात होऊ लागली आहे; आणि तरी आपण फक्त पैशांबद्दल बोलतोय, बाह्य आर्थिक विकासाचे गुणगान गातोय. त्याच्या परिकथांमध्ये रमतोय. तुमची हिंमत तरी कशी होते?
तीस वर्षांहून अधिक काळापासून विज्ञान अतिशय सुस्पष्ट आहे. त्याकडे तुम्ही पाठ फिरवलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर नेमके उत्तर आणि त्यासाठीची राजनीती दृष्टिपथातही नाही आणि तरीही खूप काही केल्याच्या आविर्भावात तुम्ही इथे येताय; तुमची हिंमत तरी कशी होते?
तुम्ही आमचं ऐकताय, समजून घेताय आणि प्रश्नाची तातडीही ओळखताय, असा तुमचा दावा आहे. मी कितीही दु:खी असले, रागाला आली असले, तरी यावर माझा अजिबात विश्वास नाही. तुम्हाला परिस्थितीचं खरोखरीच आकलन झालं असेल आणि तरीही कृती करण्यात तुम्ही अपयशी ठरला असाल तर तुम्ही वाईट आहात, असंच म्हणावं लागेल. आणि त्यावर माझा विश्वास नाही.
कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण दहा वर्षांत निम्म्यानं कमी झाल्यास तापमान दीड अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता पन्नास टक्के आहे, असं मानलं जातं. मात्र, त्यामुळे जी दुष्परिणामांची साखळी निर्माण होण्याचा धोका आहे, ती नियंत्रित करणं मानवी क्षमतेच्या पलीकडील असेल.
पन्नास टक्के कदाचित तुम्हाला मंजूर असेल; परंतु एका मर्यादेनंतर छोटेसे बदलही मोठा दुष्परिणाम घडवू शकतात, अशा 'टिपिंग पाँइंट्स'चा त्या आकड्यांत समावेश नाही. तसंच विषारी वायूप्रदूषणामुळे जी अतिरिक्त तापमानवाढ होणार आहे, त्याचा, तसेच याबाबत मिळत असलेल्या नव्या माहितीचा आणि हवामानाच्या अन्य घटकांचा विचारही केला गेलेला नाही. तुमच्याद्वारे उत्सर्जित होत असलेले अब्जावधी टन कार्बन डाय ऑक्साइड आमच्या पिढीला शोषावे लागत आहे. त्यावरील नियंत्रणासाठीचे तंत्रज्ञानही तुम्ही विकसित केलेले नाही.
म्हणूनच सांगतेय, की पन्नास टक्क्यांची जोखीम आम्हाला, म्हणजे प्रदूषणाच्या दुष्परिणामांचा सामना कराव्या लागणाऱ्या आमच्या पिढीला, अजिबात मंजूर नाही.
तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यासाठी आणि संधी ६७ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी आयपीसीसीनं (इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज) उद्दिष्टं निश्चित केली आहेत. त्यानुसार जगाला एक जानेवारी २०१८ पर्यंत ४२० गिगाटन कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जन परवडणारं होतं. ही मर्यादा आता ३५० गिगाटनपेक्षा खाली आली असून, आता वेळ फार कमी राहिला आहे.
अशा स्थितीत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन उत्तर शोधल्याच्या आविर्भावात नेहमीचं कामकाज करण्याचं ढोंग करण्याची तुमची हिंमत तरी कशी होते? कार्बन उत्सर्जनाचं आजचं प्रमाण पाहता, ते कमी करण्याचं अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी साडेआठपेक्षा कमी वर्षं राहिली आहेत.
हे आकडे खूप छळणारे आहेत. अस्वस्थ करणारे आहेत. त्यामुळे समस्येचं गांभीर्य वाढवलं असून, ही समस्या सोडविण्यासाठी तुमच्याकडे कोणतीही योजना दिसत नाही. आणि तरीही ती आहे तशी मांडण्याची परिपक्वताही तुमच्यात दिसत नाहीए.
तुम्ही आमची निराशा करीत आहात. आम्हाला वाऱ्यावर सोडत आहात; परंतु तुम्ही विश्वासघात करीत असल्याची जाणीव तरुणांना होत आहे. सर्व भावी पिढ्यांचे डोळे तुमच्याकडे लागली आहेत. ते तुमच्याकडे आशेनं पाहत आहेत. आणि तरी तुम्ही आमच्या पदरात अपयश टाकणार असाल, तर मी एवढेच म्हणेन, की आम्ही तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही.
आम्ही तुम्हाला असं अजिबात जाऊ देणार नाही. आता या क्षणी, या ठिकाणी आम्ही मर्यादेची रेषा आखतोय. तुम्हाला आवडो वा न आवडो, जग जागं होतंय आणि क्षितिजावर बदलाच्या खुणा दिसताहेत.
धन्यवाद.

On Aug. 20, 2018, a 15-year-old girl skipped school to protest outside the Swedish parliament and inadvertently started the “Skolstrejk för klimatet” (school strike for climate) movement that would go on to create ripples across the globe. The teenage activist was Greta Thunberg. She has since become one of the most important voices in environmental activism.
Greta is the daughter of Swedish actor Svante Thunberg (pictured, R) and opera singer Malena Ernman. Her grandfather is actor-director, Olof Thunberg. One of her ancestors on her father’s side is Svante Arrhenius, who had won a Nobel Prize for Chemistry in 1903. He was the first to discover that increases in atmospheric carbon dioxide lead to a rise in the surface temperature of Earth. Consequently, this finding led to the conclusion that human-caused carbon dioxide emissions lead to global warming.
On first learning about climate change around the age of eight, Thunberg was shocked that adults weren’t doing much about it. Over time, Thunberg started living a low-carbon life. She turned vegan and gave up flying. On her insistence, her mother doesn’t fly either and her father became a vegetarian.
Before she became the youngest face
of climate change, Thunberg won an essay writing competition on the environment
in May 2018 organized by Swedish newspaper Svenska Dagbladet. Following the
publication of her write-up, she was contacted by climate activist Bo Thorén of
the group Fossil Free Dalsland. It was in one of the meetings with the group
that the idea of a school strike to protest climate change came up.
On Dec. 4, 2018, the
15-year-old Thunberg addressed the United Nations Climate Change Conference
where she presented her case for protecting the environment in strong words.
“For 25 years countless people have come to the UN
climate conferences begging our world leaders to stop emissions and clearly
that has not worked as emissions are continuing to rise. So I will not beg the
world leaders to care for our future. I will instead let them know change is
coming whether they like it or not,” she stated.
The young activist was nominated
for a Nobel Peace Prize on March 13, 2019. If she wins when the awards are
announced in October, Thunberg will become the youngest recipient ever. In May
2019, TIME magazine named her as one of the 100 Most Influential People of 2019.
On Aug. 14, 2019, Thunberg took a
solar-power sailboat with underwater turbines and sailed across the Atlantic
Ocean from Plymouth, England, to New York City, New York, U.S., to attend
climate conferences in the U.S. and Chile. She reached her destination on Aug.
28.
On Sept. 16, she was awarded the
Amnesty International's Ambassador of Conscience award at George Washington
University in Washington, D.C. by Secretary General Kumi Naidoo
Comments
Post a Comment