देशभरातील पामच्या ११० प्रजाती, परातीपेक्षा भले मोठे व्हिक्टोरिया अॅमेझॉनिकेचे पान आणि पश्चिम घाटातील दुर्मिळ आणि लोप पावत चाललेल्या शंभरहून अधिक प्रजाती असलेल्या वनस्पतीशी कोल्हापूरच्या पर्यावरणप्रेमीनी महाराष्ट्र टाइम्सच्या मटा नेचरवॉकद्वारे संवाद साधला. दुर्मिळ वनस्पतीबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी उत्सुकता दाखवली. पृथ्वीरक्षण करण्यासाठी प्रत्येक झाड आणि रोपांचे संवर्धन करण्याचा निर्धार सहभागी पर्यावरणप्रेमींनी केला. शिवाजी विद्यापीठाच्या बॉटनी विभागाने तब्बल तीस वर्ष परिश्रम करुन जिद्दीने बोर्टनिकल गार्डन ची उभारणी केली आहे. केंद्रीय मंत्रालयाने भारतातील लीड बोर्टनिकल गार्डन म्हणून मान्यता दिली असून १२०० हून अधिक वनस्पतीच्या प्रजाती आहेत. मटाने आज सोमवारी सकाळी नेचर वॉकच्या माध्यमातून ही गार्डन पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विवेकानंद, गोखले, न्यू कॉलेजसह ज्येष्ठ नागरिक, तरुण, अभ्यासक, पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते. अनेक सहकुटुंबे लहान मुलासह नेचर वॉकमध्ये आले होते. बॉटनी विभागप्रमुख वर्षा जाधव (राठोड) यांनी उपस्थित स...